कडधान्ये काढणीच्या कामांना वेग

| खांब-रोहा । वार्ताहर ।
ग्रामीण भागात रब्बी हंगामातील कडधान्ये पिकांचे अंतिम टप्प्यातील कामांची लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. चालू हंगामात दीपावली सणापर्यंत लांबलेला परतीचा यामुळे कडधान्ये पिकांची लागवड योग्य कालावधीत होऊ शकली नाही. उशिरा पेरणी होऊनही कडधान्ये पिके चांगली आल्याने शेतकरी वर्गाच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. अधून मधून पडणारी कडक्याची थंडी व सोबतीला असणारे दाट धुके यामुळेही पिकांचे वाढीस योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानेही चालू कडधान्ये पिकांचे हंगामात कडधान्ये पिके जोमदार आल्याचे पहावयास मिळाले. ग्रामीण भागात कडधान्ये पिके काढण्याचे अंतिम टप्प्यातील कामास प्रारंभ झाला असून शेतकरीवर्ग कडधान्ये पिकांची काढणी,झोडणी व साफसफाई करण्याचे कामाला गुंतला आहे.

Exit mobile version