| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाच्या चारचाकी वाहनाला वॉटर पॉईप स्टेशनच्या खाली असलेल्या वळणावर अपघात झाला. अपघातामध्ये चार पर्यटक जखमी झाले आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. जखमींना टॅक्सी चालकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.
शनिवार असल्याने माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात आपली खासगी वाहने घेऊन येत असतात. मुंबईहून माथेरानमध्ये येत असताना एका अल्टो वाहनाला अपघात झाला. रस्त्याच्याकडेला रेलींग नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाला असून या अगोदर देखील अशाच प्रकारे येथून दहा ते बारा गाड्या खाली पडल्याचे टॅक्सी चालक मालक युनियनचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी सांगितले.