वडखळ येथे अपघात

। अलिबाग । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ परिसरात एका वाहनचालकाच्या बेताल वृत्तीमुळे अपघात घडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील वडखळ ग्रामपरिसरातील बापदेव आळी येथे हा अपघात घडला आहे. या अपघातास आरोपी(30) जबाबदार असून, संबंधित परिसरात त्याच्या ताब्यातील बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. एमएच.06.बीएफ.2693) भरधाव वेगात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या बाजूने चालवित होता.
दरम्यान, या घटनेतील फिर्यादी याच मार्गाने, त्यांच्या ताब्यातील बजाज व्लॅटिना (क्र. एमएच.06.एटी.6427) या वाहनाने सहकुटुंब प्रवास करित होते. त्यांना आरोपीने समोरून येत धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान घडले असून, आरोपीसह फिर्यादी यांची पत्नी तथा मुलगा यांना दुखापत झाली आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाईस सुरूवात करण्यात आली असून, अधिक तपास करण्यात येत आहे.

Exit mobile version