मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण

। पाताळगंगा । प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात मोकाट गुरांमुळे वाहन चालकांनी रस्त्यावरुन मार्ग काढणे कठीण झाले आहे. ही मोकाट गुरे सरळ रस्त्याच्या मधोमध बसण्याचा मार्ग अवलंबतात. परिणामी, वाहतुक कोंडीची समस्या डोकेवर काढत आहे. त्याच बरोबर वाहन चालकास अपघातास निमंत्रण देत आहेत.

रात्रीच्या वेळी वाहन चालकाच्या समोर अचानक मोकाट गुरे आल्यास अपघात होण्यास वेळ लागत नाही. मोकाट गुरांनी प्रामुख्याने खालापूर, खोपोली, आपटा, मोहपाडा, रसायनी या परिसरात या गुरांनी आपला मोर्चा रस्त्यावर वळविला आहे. परिणामी वाहतुक कोंडी, अपघात इ. समस्या भेडसावत आहे.

Exit mobile version