वडखळ येथे ॲक्टिवाला ठोकर मारून अपघात; दोनजण जखमी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ येथील देवळी गावाजवळ शालिमार हॉटेलच्या समोर एका अज्ञात वाहनाने दुचाकी ॲक्टिवाला ठोकर मारून अपघात झाला आहे. या अपघातात ॲक्टिवावरील दोघेजण जखमी झाले आहेत.


करंजपेठ, पेण येथे राहणाऱ्या फिर्यादींच्या ताब्यातील ॲक्टिवा स्कुटी क्र. एम.एच.06 सी.एफ.5348 ही मुंबई लेनने पेन येथे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने ठोकर मारून पळ काढला आहे. या अपघातात फिर्यादी व त्यांच्या गाडीवरील महिला हे दोघे जखमी झाले असून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार धुपकर हे करीत आहेत.

Exit mobile version