कशेडी घाटात अपघात; ट्रकचे तुकडे

। पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मध्यरात्रीनंतर ट्रकचा भीषण अपघात होऊन कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले. चोळई गावावर पुर्वीपासून अपघातातील वाहने कोसळण्याची टांगती तलवार असताना अलिकडेच दरडी कोसळण्याची टांगती तलवार चोळई गावावर निर्माण झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावच्या हद्दीत ट्रकचा अपघात झाल्याची घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एम एच 43जे 9855) हा गोव्याकडून कल्याणकडे घेऊन जात असताना चोळई येथे एका अवजड वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस जाऊन 2 वेळा कलंडल्याने हा अपघात घडला. या अपघातात ट्रकचे तुकडे तुकडे झाले. मात्र, चालक सुनील वाघमारे यात सुदैवाने बचावला.

या घटनेची खबर पोलादपूर पोलीस ठाण्यात कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व महिला पोलीस नाईक पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी चालक सुनील वाघमारे याला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Exit mobile version