झिराडमध्ये अपघात; जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

। अलिबाग । सायली पाटील ।
अलिबाग- मांडवा मार्गावर झिराड येथे झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. झिराड येथे मंगळवारी (दि.1) हा अपघात घडला. यामध्ये चालकाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईहून एमएच 02 डीजे 8776 या क्रमांकाच्या कारने एक कुटूंब फिरण्यासाठी आले होते. कार मालक चालकासह कुटूंबाला घेऊन फिरण्यासाठी आले होते. मात्र अपघाताप्रसंगी मालक गाडी चालवित असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गाडीवरील ताबा सुटल्याने मालकाने थेट झाडावर गाडी आदळली. कारमधून एकूण सहा प्रवासी प्रवास करीत असून त्यामध्ये एका बालकाचा समावेश आहे.

Exit mobile version