अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घरत यांचा मृतात समावेश
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रेवस अलिबाग रस्त्यावर झिराड नांदाईपाडा येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ह्युंदाई आय टेन कार मांडवा येथून अलिबागच्या दिशेला जात होती. सदर कार रेवस अलिबाग रस्त्यावर झिराड नांदाईपाडा येथे आली असता चालक निलेश घरत यांचे नियंत्रण सुटल्याने समोरील सायकलस्वाराला उडवले. त्यानंतर वडाच्या झाडाला ठोकर दिली. त्यात सायकलस्वार आणि कारचालक निलेश घरत हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थ आणि मांडवा पोलिसांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या अपघातात अनिस चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घरत यांचे निधन झाले. निलेश घरत अलिबाग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक अत्यंत अभ्यासू व क्रियाशील कार्यकर्ते होते. सध्या ते अंनिसच्या राज्य कार्यकारिणीचा सदस्य होते.