। खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी नजीक रिक्षा अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला झोप अनावर न झाल्याने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटून ती संरक्षक कठड्याला धडकून अपघात झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाश बंडबे (5), संगीता भिकू बंडबे (65), भिकू बापू बंडबे (75) व सुभाष भिकू बंडबे (34) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. हे सर्व मुंबईहुन राजापूर येथे जात होते. या अपघाताची माहिती मदत ग्रुपचे अद्यक्ष प्रसाद गांधी व हेमंत पवार यांना मिळताच रुग्णवाहीका घेऊन अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.






