| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग – मुरुड मार्गावरील काशीदजवळ कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.23) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
मंदार नरेश मोरकर असे या अपघातातील मयताचे नाव असून, हा इसम चेंबूर येथील रहिवासी आहे. एका चारचाकी वाहनातून मुरुडमध्ये चौघेजण फिरण्यास आले होते. काशीद येथील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये कार पलटी झाली. त्यामध्ये मंदार गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.