मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भरघाव बसचा अपघात

। खालापूर । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर भरघाव बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. वाहनचालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असून त्याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. आरोपी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज न घेता त्याच्या आरोपीच्या ताब्यातील एस. आर. कंपनीची बस भरधाव वेगाने चालवित होता. दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गाचे काम सुरू असल्याने बस पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. आरोपीविरूद्ध बसमधील एका प्रवाश्याने फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.

Exit mobile version