सिलिंडरच्या टेम्पोला अपघात

कर्जत-पाथरज रस्त्यावरील घटना

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पाथराज रस्त्यावर एक गॅस भरून निघालेल्या पिकअप टेम्पोला अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नसली तरी मोठा अनर्थ होता होता टळला आहे. वाहनात घरगुती वापरात येणाऱ्या गॅस सिलिंडर टाक्या असल्याने याचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडा नसल्याने आणि वळणावर वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.

पाथराज येथे राहणारे शिंगाडे यांचा हा टेम्पो असून, गॅस सिलिंडर वितरण करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान, शिलार पाथराज रस्त्यावर या पिकअप टेम्पोला अपघात घडला. रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. दरम्यान, या रस्त्यावर अनेक वेळा वाहनांचे अपघात घडले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. येथील रस्त्यावरच्या वळणावर तर रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडा नसल्याने अपघाताची मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version