| माथेरान | वार्ताहर |
माथेरान घाटात मालवाहू पिकअप टेम्पोला गुरुवारी (दि. 2) अपघात झाला. उतारावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. यामधे डीजे साऊंड सामान असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात चालक आणि अन्य दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
नेरळ माथेरान घाटात नवीन वर्षाला वाहनाचे अपघाताचे सत्र सुरू झाल्याचे चित्र आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या इनोव्हा कारला अपघात झाला होता, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती, मात्र वाहनाचे मोठे नुकसान आले होते. त्यातच सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मालवाहू पिकप टेम्पोला घाटात अपघात घडला. जुम्मापट्टी येथील प्रसिद्ध एस टन वळणावर पीकप टेम्पोला उतरत असताना अपघात घडला. यामध्ये चालक आणि अन्य दोन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. सुरुवातीला येथे वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हीच वाहतूक सुरळीत सुरू झाली होती.
एकूणच, माथेरान घाटात वाहन चालक वाहनाच्या जास्त क्षमतेपेक्षा मालाचे वाहतूक करतात त्यामुळेच वाहनाचे ब्रेक न लागणे, चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याचे प्रकार घडत आहेत.