पुण्यातील पर्यटक गंभीर जखमी
| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड येथे पुण्यातील पर्यटकाची गाडी 60 फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
याबतचे सविस्तर वृत्त असे कि, रविवारी पुणे येथील काहीजण पर्यटनासाठी इको गाडीने मुरुडकडे येत होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इको गाडी राजवाडा नजीक आली असताना एका अवघड वळणावर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी खोल 60 फूट दरीत कोसळली. यातील काही जणांच्या हाता-पायाला फॅक्चर झाले, तर काहींना डोक्याला मार लागला आहे. घटनास्थळी तातडीने पोलिस पोहचले. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे दाखल करण्यात आले. परंतु यातील काही जणांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालय अलिबाग येथे हलवण्यात आलेे.