। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर-महाबळेश्वर-वाई, सुरूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी (दि.11) सायंकाळी इनोव्हा आणि पिकअप जीपचा समोरासमोर अपघात होऊन पिकअपचालक गंभीर जखमी झाला.
मुंबईतील चारकोप, कांदिवली पश्चिम येथील गणेश बालाजी कांबळे (वय 33) हे त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन पोलादपूरच्या दिशेने येत असताना आंबेमाची गावानजीक पोलादपूर बाजूकडून कोंबडयांची वाहतूक करणारी पिकअपजीप घेऊन क्षेत्रपाळ येथील विठ्ठल दिनकर भिलारे (वय 53) हे महाबळेश्वरकडे चालले होते. घाटात या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. यामध्ये विठ्ठल भिलारे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. अपघाताची माहिती इनोव्हा चालक गणेश कांबळे यांनी पोलादपूर पोलिसांत दिली. जखमीवर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. पोलीस हवालदार शिरगांवकर अधिक तपास करीत आहेत.
आंबेनळी घाटात इनोव्हा-पिकअपचा अपघात
