कारमधील 10 जणाां मृत्यू
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. मागून भरधाव वेगाने येणार्या कारने टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. कारमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याशिवाय एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर बुधवारी हा अपघात झाल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले.