। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग- पोयनाड मार्गावर तिनविरा येथे दुचाकी व जेसीबीच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही काळ हा मार्ग ठप्प झाला होता.