अलिबाग – रोहा मार्गावर अपघात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग – रोहा मार्गावरील कावीर येथे दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही गाडयांचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि.24) सकाळी घडल्याची माहिती समोर येत आहे.

रोहाकडून अलिबागकडे चारचाकी वाहन जात होते. दरम्यान कावीर जवळ आल्यावर एक दुचाकी समोरून आली. दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारला जोरदार धडक लागली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. दुचाकी चालकाने चुकीने मार्गाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version