। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरानजीकच्या हातखंबा ते खेडशी जाणार्या रस्त्यावर दोन वाहनांमध्ये धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र सदानंद चवंडे (61) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.23) सायंकाळी पाचच्या सुमारास हातखंबा ते खेडशी जाणार्या रस्त्यावर पानवल फाटा येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुरेंद्र चवंडे हे पानवल फाट्यापुढे वाहन निष्काळजीपणे चालवून वैभव विजय वाघाटे (31) यांच्या कारला धडक देऊन अपघात केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय वाजे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.