। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीकडून पेणच्या दिशेने लोखंडी बार घेवून जाणार्या ट्रेलरला रानसई गावाजवळ अपघात घडला. या अपघात ट्रेलरमधील बार चालकाच्या केबीनमध्ये मागून घुसल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पेणच्या दिशेने कंपनीत लोखंडी बार घेवून जाणारा ट्रेलर रानसई गावाजवळ आला असता रस्त्याचे काम सुरू असल्याने चालकाला अंदाज न आल्यामुळे चालकाने ब्रेक मारला. त्यावेळी ट्रेलर समोरून पलटी झाला. यावेळी मागील लोखंडी बार चालकाच्या केबीनमध्ये घुसल्याने चालक सधर जी (36,रा तामिळनाडू) याचा जागीच मृत्यु झाला.