मुंबई-गोवा हायवेवर अपघात

। खालापूर । वार्ताहर ।
वाहन चालक रस्त्यांकडे तसेच वाहनांकडे दुर्लक्ष करून बेदारकपणे वाहन चालवत असतात. त्यामुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दि.5 नोव्हेंबर रोजी मुंबई-गोवा हायवे रोडवर मौजे जिते गावच्या हद्दीत अपघात झाला आहे. मुरुड डेपो येथील अनकवाडी, आपोरली, अकोला येथे आरोपी याने आपले ताब्यातील एसटी बस क्र.एम एच 14 बी 1406 ही मुंबई-गोवा हायवे रोड, पनवेल ते अलिबाग अशी चालवीत घेऊन जात असताना मौजे जिते गावच्या हद्दीत मुंबई-गोवा हायवे रोडवर आलेवेळी बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदारकारपणे चालवून पुढे चालणार्‍या स्विफ्ट कार क्र.एम एच 06बी 2330 ला मागील बाजूस ठोकर मारून अपघात केला. या अपघातात जखमी यांना लहान-मोठ्या गंभीर दुखापती होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मपोह/95 पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version