मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे रोडने खोपोली कडे येत असताना बुधवार (दि. 6) रोजी 08:00 वा च्या सुमारास ढेकु गावच्या हददीत टाटा टेंम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. टाटा टेंम्पो नं.एमएच/04/जीसी/ 7297 च्या चालकाने पाठीमागून ट्रक क्र.एमएच/09/एफएल/3360 ला धडक दिली. यामध्ये टेंम्पो चालकाचा गंभीर स्वरूपाच्या दुखापती होवून मृत्यु झाला. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version