। पोलादपुर । वार्ताहर ।
पोलादपुर तालुक्यातील कापडे हददीत कंक वॉशिंग सेंटर समोरच्या पोलादपुर महाबळेश्वर रोडवर 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास कृष्णा दादा गेळे (वय 26) या दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणार्या आर्यन कंक (वय 12 वर्ष) रा. रानवडी पोलादपुर या मुलाल ठोकून अपघात केला आहे व या अपघातात या मुलाला गंभीर मार लागला आहे.
आरोपी याने त्याच्याजवळील दुचाकी क्र. एम एच 11 सी बी 9251 गाडीने इंन्सुरंन्स नसताना व वाहन चालविण्याचा परवाना नसताना अतीवेगाने चालवत होता. कंक वॉशिंग सेंटर समोरील रोडवर समोरच्या बाजुने एक तरुण रस्ता ओलांडत आसतान हा दुचाकीस्वार त्याला येऊन ठोकला. ही घटना संजय झाराणे (रानवडीयेथील दुकानदार)याने पाहिली व सदर घटनेबाबत पोलादपुर पोलीसांना कळवले. या अघातात पिडीत तरूण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. व या घटनेचा सखोल तपास व्ही.व्ही.महाडिक हे करीत आहेत.
पोलादपुर महाबळेश्वर रोडवर अपघात; १२ वर्षाचा मुलगा जखमी
