दिनानाथ जुईकर यांचे अपघाती निधन

भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत शहाबाज हद्दीतील पांडवादेवी चौकीचापाडा गावचे रहिवासी दिनानाथ बाळाराम जुईकर यांचे 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 65 व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच संपूर्ण पांडवादेवी चौकीचापाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व. जुईकर हे नवजवान सेवा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, तर माजी आ. पंडित पाटील यांचे वर्गमित्र होते. सार्वजनिक बांधकाम विभागात कारकून ते सहाय्यक अभियांत्रिकी अशी 35 वर्षे सेवा करुन ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पार्थिवावर चौकीचापाडा गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांच्या वतीने गोपीनाथ पाटील, जगदीश पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली, तर नवजवान सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ सदस्य बाळूशेठ पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.
स्व. दिनानाथ जुईकर यांचे उत्तरकार्य दहावा गुरुवार, दि. 30 सप्टेंबर रोजी घरच्या स्वरुपात, तर तेरावे 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सहा भाऊ, चार बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version