धनंजय पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर
भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील नवीन देहेन गावचे माजी उपसरपंच धनंजय पाटील यांच्या बहिणीचे पती राजेंद्र रामचंद्र जुईकर यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. या धक्कादायक बातमीने बाबांनी ध्यास घेतला आणि बाबा काशीनाथ पाटील यांचे सोमवार, दि. 9 ऑगस्ट रोजी निधन झाले. आपले जावई आणि पती यांच्या निधनाने आई पूर्णतः धास्तावून गेली आणि तिसर्या दिवशी आई राघूबाई पाटील यांनी गुरुवार, दि. 12 ऑगस्ट रोजी प्राण सोडला. या घटनेची बातमी कळताच संपूर्ण नवीन देहेन परिसरात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र जुईकर यांच्यावर मुंबईत, तर काशिनाथ पाटील व राघूबाई पाटील यांच्यावर नवीन देहेन गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्वेश्वर भजन मंडळ, संत तुकाराम भजन मंडळ, देऊ आळंदी पायी दिंडी यांच्या वतीने पार्थिवावर पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर, जगन्नाथ महाराज यांनी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
आई राघू बाई आणि वडील काशीनाथ पाटील यांचे उत्तरकार्य एकाच दिवशी शनिवार, दि. 21 ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा धनंजय, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.