चिपळूण | प्रतिनिधी |
जंतर मंतर ते दिल्ली अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी दलितांवर वाढत्या अत्याचारांविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांनी दलितांवर वाढत्या अत्याचाराला कारणीभूत असलेल्या मोदी सरकारचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून मनोजी बागडी महाराष्ट्र निरीक्षक, महाराष्ट्राचे अनुसूचित जाती अध्यक्ष विजय अंभोरे, रवींद्र दळवी, कार्याध्यक्ष गौतम लोखंडे, जितेंद्र देहाडे, अहमदनगरमधून श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहुजी कानडे, नंदकुमार मोरे उपाध्यक्ष, प्रदेश समन्वयक कोकण प्रभारी सुनील सावर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीमधून संगमेश्वर तालुकाध्यक्ष उदय पवार, खेडमधून चंद्रकांत पेवेकर, रोहित जाधव, मधुकर सावर्डेकर, अरविंद खेरटकर, विजय मोरे, दिनेश सावर्डेकर, किशोर चिपळूणकर, भगवान कदम, प्रकाश सावर्डेकर, कुणाल पेढामकर, रोहित कदम, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.