महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू

| उरण | प्रतिनिधी |

उरण येथील बोरी नाका येथे सोमवारी (दि.24) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात उरणमधील राम रतन हॉटेलचे मालक महेंद्र सहतिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहतिया दाम्पत्य द्रोणागिरीवरून मोरा असा स्कुटीवरून प्रवास करत होते. बोरी नाका येथे रस्त्यावर असलेल्या मोकाट जनावराला धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महेंद्र सहतिया यांचा मृत्यू झाला. याबाबत उरण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version