रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर
| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात मोकाट गुरे ही वाहनचालकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.ही मोकाट गुरे सरळ रस्त्याच्या मधोमध बसण्याचा मार्ग अवलंबतात. परिणामी, वाहतुकीची कोंडीची समस्या डोके वर काढत आहे. त्याचबरोबर वाहन चालकास अपघाताला सामोरे जावे लागत आहे. ही वस्तुस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामध्ये मोकाट गुरे आणि शेतकर्यांच्या गुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
रात्रीच्या वेळी सावरोली-खारपाडा या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्यामुळे वाहनांच्या धडकेत या गुरांना प्राणास मुकावे लागते. त्याचबरोबर गुरेचोरीचे प्रमाण वाढले आहे. खालापूर, खोपोली, आपटा, मोहपाडा, रसायनी या परिसरात मोकाट गुरांनी रस्त्यावर आपला मोर्चा रस्त्यावर वळविला आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी, अपघात इ. समस्या भेडसावत आहेत. या सर्व कारणांवरून अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.