खेडच्या सभेत आरोपांच्या फैर्‍या

| खेड | प्रतिनिधी |
शिवसेनेच्यावतीने खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित नेतेमंडळींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंची सभा म्हणजे आपटीबार होता.त्यांच्या सभेत तोच तोच थयथयाट,तीच तीच आदळाआपट हेच पहावयास मिळाले. त्याला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही.गेली सहा महिने हेच सुरु होणार आहे. आता पुढील सहा महिने ही सर्कस महाराष्ट्रात होणार आहे.अशी टीका शिंदे यांनी केली.

सत्तेसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाला सोडले,आजही कोकण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी पाठीमागे ठाम उभा आहे.आम्ही केलेल्या क्रांतीत कोकणातील आमदारही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले आहेत.उठावाचा निर्णय घेतला नसता तर सगळ्यांची अवस्था अतिशय शोचनिय झाली असती,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी गद्दारी केली.तो डाग पुसण्याचे काम आम्ही केले आहे.गद्दारी आम्ही नव्हे तर तुम्हीच केली.असा आरोपही शिंदे यांनी केला.

Exit mobile version