महिलेच्या खूनप्रकणी आरोपीला अटक

| पनवेल | वार्ताहर |
माथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका 25 ते 30 वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन खात्री केली असता सदर महिलेचा गळा आवळून खून करून महिलेचे प्रेत नदीपात्रात फेकून दिले असल्याने लक्षात आहे. गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटिव्हि फुटेज मिळून येत नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांना अतिशय आव्हानात्मक होते.

या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल, नवी मुंबई पथकाने मयत महिलेच्या प्रेतावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास तात्काळ सुरू केला. तांत्रिक तपास करून महिलेचे सोबत असलेल्या इसमाची ओळख पटवण्यात आली. यामध्ये सीसीटिव्ह फुटेजमधील संशयीत आरोपीताचा शोध घेत असताना तो घनसोली परिसरामध्ये असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेलच्या पथकाने सापळा लावुन रियाज समद खान (वय 36 वर्षे, राठी- रूम नं. 506, म्हाडा कॉलनी, गौतम नगर, देवनार) आणि इमाण इस्माईल शेख (वय 28 वर्षे, राठी रूम नं 611, बिल्डींग नं 2 सी, इंडीयन ऑइल नगर) यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली.

यामध्ये ज्या महिलेचा खून झाला होता ती महिला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (वय 27 वर्षे, राठी – कोपरखैरणे) असून ती रियाज खान याची प्रेमिका असल्याचे सांगितले. त्याच्या मागे तिने लग्नाकरीता तगादा लावल्याने रियाज याने त्याचा मित्र इमान शेख यांच्या मदतीने उर्वशीचा लाल रंगाच्या बलेनो कार मध्ये तिचा रस्सीने गळा आवळुन खुन केला. तसेच दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणेसाठी धामणी येथे गाढी नदीचे पुलावरून मृतदेह फेकुन दिल्याचे तपासात निष्पण झाले. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाची सपोनि प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, पो. हवा. प्रशांत काटकर, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, मधुकर गडगे, तुकराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्‍वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, पो.ना, अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेर्‍या, पो. शि. संजय पाटील, विक्रांत माळी यांनी केली आहे.

Exit mobile version