मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा

। माणगाव । प्रतिनिधी ।
आपल्या राहिलेल्या पगारातील दोन हजार रुपये आरोपीकडे मागितले असता फिर्यादी व सहकारी साक्षीदार यांना आरोपीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगाव तालुक्यातील भुवन गावी सर्वेश पवार यांचा मित्र सुरज सकपाळ यांच्या घरासमोर घडली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील सर्वेश पवार हे आरोपी अकेश अंकुश फराडे (वय-26) रा.भुवन ता.माणगाव यांच्याकडे वडापावच्या धंद्यावर तीन महिने कामावर होते. त्यावेळी पवार यांनी आपला राहिलेला दोन हजार रुपये पगार मागितला असता त्या गोष्टीचा अकेश फराडे यास राग येऊन त्याने पवार हा मित्र सुरज सकपाळ यांच्या घरासमोर बसला असताना मारहाण करून डोक्याला चावा घेतला. तसेच साक्षीदार हर्षल काशीराम ढवूळ रा.भुवन हा भांडण सोडवायला आला असता त्यालाही मारहाण करून पाठीवर व नाकाला चावा घेऊन दुखापत केली. तसेच पवार याची आई सुषमा पवार, वडील सुभाष पवार यांना देखील मारहाण करून शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिली.
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.151/2022 भादवि संहिता 1860 चे कलम 324, 323, 504, 506 अन्वये करण्यात येऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपस पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर हे करीत आहेत.

Exit mobile version