। पनवेल । वार्ताहर ।
चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस स्थानिक नागरिकांच्या मदतीने पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. तालुक्यातील भंगारपाडा येथील विघ्नहर्ता निवासमध्ये असलेल्या बाथरुमच्या खिडकीतून आत घुसून घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विनायक मुंढे (29 रा.सोमटणे) या इसमास स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून घरफोडीत लागणारे साहित्य हस्तगत केले आहे. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे देवळे व त्यांच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेवून पुढील तपास करीत आहेत.