वृद्धेच्या हत्येप्रकरणीआरोपींना कोठडी

माणगाव | प्रतिनिधी |

म्हसेवाडी येथील संगिता श्रीरंग सावंत (वय-69) यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघाजणांना माणगाव न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुभाष दळवी (वय 50), प्रशांत कदम (वय 55), राजेश सावंत (वय 58) सर्व राहणार म्ह्सेवाडी माणगाव या तिघांना संशयीत आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशी नंतर ते तिन्ही आरोपी निष्पन्न झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

Exit mobile version