| माणगाव | वार्ताहर |
माणगाव-साई रस्त्यावर विहूले कोंड गावच्या हद्दीत वळणावर रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. सदर अपघात दि. 13 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद अनिल गणपत महाडिक (वय-55) रा. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघातातील फिर्यादी अनिल गणपत महाडिक यांचा भाऊ रमेश गणपत महाडिक (वय-45) रा. विहूले कोंड ता. माणगाव हे साई येथे बाजारकरून साईमधून परेश पंढरी सावंत यांची रिक्षा क्र. एम.एच.06 ए.एल 8220 या गाडीमध्ये बसून घरी परत येत असताना विहूले कोंड गावच्या हद्दीत वळणावर आल्यावर आरोपी चालक सावंत याने त्याच्या ताब्यातील रिक्षा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अति वेगाने चालविल्याने रिक्षा वळणावर उलटून अपघात घडला. या अपघातात महाडिक यांचे दोन्ही पायांना गंभीर दुखापती होऊन रिक्षाचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर हे करीत आहेत.