। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पाले खुर्द येथील रहिवासी कैलास राजेश सप्रे (21) याला 18 नोव्हेंबर रोजी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. नोव्हेंबर 2024 मध्ये, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली. दारू पिऊन त्याने तिला मारहाणही केली. याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी कैलास राजेश सप्रेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
