महिलांची छेडछाड करणारा पोलिसांच्या जाळ्यात

| तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांची छेडछाड करून चोरी करणारा आरोपी बुधवारी तळा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. निलेश हरिश्‍चंद्र कांबळे असे आरोपीचे नाव असून तो म्हसळा तालुक्यातील मु.बनोटी पो.वरवटणे येथील रहिवासी आहे.

तालुक्यातील चोरीवली, तारणे, कासेखोल, मांदाड, पन्हेळी या गावात सदर आरोपीने धुमाकूळ घातला होता. आरोपीला पकडण्यासाठी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी शिवराज खराडे, सुरेश पवार, संजय शिंदे यांचे पथक नेमले होते. त्यानुसार या पथकाने विविध ठिकाणी घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सापळा रचण्यात आला होता. बुधवारी तळा मांदाड रस्त्यावर कांबळे हा आपल्या मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. यावेळी त्याचे बोलणे संशयास्पद आढळून आल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.

Exit mobile version