148 जणांची आरोग्य तपासणी
| तळा | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत रायगड जिल्हा आरोग्य सेवा विभागामार्फत बुधवारी (दि.9) रोजी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमधून तपासणी दौरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या तपासणीदरम्यान स्क्रिनिंग करण्यात आली. या आजाराविषयी व्यक्ती सहसा पुढे येत नाही व आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. तसेच लक्षणे असली तरी समजली जात नाहीत. हा आजार आटोक्यात राहण्यासाठी वेळीच काळजी घेतली तर बरा होऊ शकतो व वेळीच उपचार घेता येऊ शकतो. यासाठी महाराष्ट्र शासनाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमधून तपासणी दौर्याचे आयोजन केले आहे.
यावेळी एकूण148 लाभार्थ्यांपैकी 130 स्त्री, 18 पुरूष असून, तीन स्त्रिया व एका पुरुषाला कॅन्सरची लक्षणे दिसून आली. या कार्यक्रमास तहसीलदार स्वाती पाटील, महादेव शिंदे (गटविकास अधिकारी), डॉ. वंदनकुमार पाटील (तालुका आरोग्य अधिकारी, तळा),सर्व कर्मचारी वृंद, वैद्यकीय अधिकारी तळा, मांदाड, समुदाय आरोग्य अधिकारी तळा, आरोग्य सेवकसेविका, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका, तालुका समूह संघटक, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, तालुक्यातील महिला व पुरुष उपस्थित होते.