| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत 31 कोटी 74 लाख 44 हजार 533, तर उरण नगरपरिषदेकडे 36 कोटी 50 लाख 61 हजार 899 रुपये अशी एकूण एमआयडीसीची 67 कोटी 87 लाख 45 हजार 661 रुपये थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता ग्यानदेव सोनावणे यांनी दिली. करोडो रुपयांची पाणीपट्टी थकल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा करण्यावर होत असल्याचेही सोनावणे म्हणाले उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे.31 मार्च 2025 अखेरपर्यंत 19 ग्रामपंचायतींकडे 31 कोटी 74 लाख 44 हजार 533 रुपयांची थकबाकी आहे. या बिलामध्ये पाण्याचे बिल, वाढीव कोटा आणि डीपीसीचा समावेश आहे.
दरम्यान, 19 पैकी काही ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र, अशा सधन समजल्या जाणार्या ग्रामपंचायतीच थकबाकीदार म्हणून आघाडीवर आहेत. याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
थकबाकीदार ग्रामपंचायती
नवीन शेवा- एक कोटी 36 लाख 22 हजार 524, करळ- एक कोटी 6 लाख 37 हजार 277,
धुतुम-एक कोटी 56 लाख 45 हजार 302,
जसखार-दोन कोटी 51 लाख 25 हजार 527,
फुंडे-तीन कोटी 66 लाख 61 हजार 196,
सावरखार- 68 लाख 24 हजार 471,
डोंगरी- 76 लाख 38 हजार 602,
सोनारी- 51 लाख 63 हजार 885,
चाणजे-10 कोटी 76 हजार 736,
पाणजे-12 लाख 60 हजार 967,
चिर्ले--दोन कोटी 47 लाख 88 हजार 046,
दिघोडे-एक कोटी 39 लाख 35 हजार 469,
दादरपाडा-22 लाख 95 हजार 044,
वेश्वी-एक कोटी 24 लाख 19 हजार 290,
पागोटे - 6 लाख 24 हजार 623,
झेडपी चिरनेर कनेक्शन- तीन कोटी 28 लाख 77 हजार 144,
रांजणपाडा-5 लाख 57 हजार 377,
नवघर-24 लाख 12 हजार 126,
झेडपी खोपटा कनेक्शन- 11 लाख 18 हजार 156 आदी 19 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वाधिक थकबाकी उनपकडे
सर्वाधिक थकबाकी 36 कोटी 50 लाख 61 हजार 899 उरण नगर परिषदेकडे आहे. विशेष म्हणजे, मागील 10 वर्षांपासून भाजपची या उनपवर सत्ता होती. मागील दोन वर्षांपासून उनपचा कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे.
थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना नोटीसाही पाठवण्यात येतात. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतींची माहिती गटविकास अधिकार्यांनाही नियमितपणे दिली जाते. मात्र, उनप, ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे.
ग्यानदेव सोनावणे,
उपअभियंता, एमआयडीसी