| महाड | प्रतिनिधी |
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व 1 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एस.डी. सणस यांनी केला. या प्रकरणातील आरोपी शंकर बळीराम पवार (29) रा. कोळ बोडेवाडी, ता. महाड, जि. रायगड याच्याविरुद्ध तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. महाड येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपी शंकर पवार याला दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने आरोपीस दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. जितेंद्र दत्तात्रेय म्हात्रे यांनी काम पाहिले. महाड शहर पोलिसांच्या तपासामुळे जुन्या खून प्रकरणाला न्यायालयीन निकाल मिळाल्याने पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.
खूनप्रकरणी आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास
