अलिबाग । विषेश प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शंकर भाऊ पवार (वय 30) याला अलिबाग येथील विशेष न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासासह 1 लाख रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
24 एप्रिल व 25 एप्रिल 2020 रोजी ही घटना घडली होती. 24 एप्रिल 2020 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 13 वर्षीय पीडित मुलगी ही तिच्या आजीसोबत झोपडीबाहेर चुलीवर जेवण बनवत होती. शेजारी राहणारा शंकर पवार (रा.आदिवासी वाडी कार्ले, मूळ राहणार-आदिवासीवाडी पो.गडब, ता.पेण) तेथे आला. यावेळी आजीने मुलीला भाजीत मीठ टाकण्यासाठी सांगितले, म्हणून ती मीठ आणण्यासाठी झोपडीत गेली. तिच्या पाठोपाठ शंकर पवार हाही झोपडीत गेला व तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर दुसर्या दिवशी 25 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्याबरोबरच्या दोन मित्रांसोबत जंगलातून चालत चालली होती. यावेळी जंगलातील दाखविण्याच्या बहाण्याने शंकर पवार त्यांच्यासोबत गेला. पीडित मुलगी व तिच्या मित्रांना कार्ले गावच्या जंगल हद्दीपर्यंत आणले. तेथे आल्यानंतर त्या मुलीच्या मित्रांना पैसे देऊन त्याने खरेदीसाठी गावात पाठविले. यादरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शंकर पवार याच्याविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर अलिबाग येथील विशेष न्यायालयात दोषोरापपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात जिल्हा शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी 8 साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिचा मित्र, वैद्यकीय अधिकारी व तपासिक अंमलदार दिपाली खाडे यांची साक्ष महत्वाची
सुनावणीअंती अलिबाग येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 यांनी आरोपी शंकर भाऊ पवार याला दोषी ठरवत, 20 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 1 लाख रुपये दंडाची रक्कम ही पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने आहेत.
दरम्यान, या खटल्यात पैरवी अधिकारी सचिन खैरनार, पोलीस शिपाई प्रियांका सायगावकर, पोलीस हवालदार संतोष अडीत, पोलीस शिपाई सिद्धेश पाटील, प्रणिता खताळ यांचे मोलाचे सहकार्य ठरले.