देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर देशी विदेशी मद्यसाठा विक्री करणार्‍या एका इसमावर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल ने कारवाई करून त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरातील पनवेल रेल्वे स्टेशन, एनएमएमटी बस थांब्याच्या जवळ फुटपाथ लगत असलेल्या झाडाखाली एक इसम देशी विदेशी मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या जवळ बाळगत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, पोहवा गडगे, पोहवा इंद्रजित कानू व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी रोशन सय्यद (वय 36) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून देशी विदेशी 1360 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

Exit mobile version