हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई

| दांडगुरी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे हातभट्टी दारू विक्री जोरदार सुरू असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याविरोधात दिघी सागरी पोलिसांकडून विके्रत्यांची झाडाझडती घेत कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदशर्नाखाली बोर्ली पंचतन शहरातील तीन हातभट्टी दारू विक्रेते त्यांच्यावर ठोस कारवाई केल्याने सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले बोर्ली पंचतन शहरात काही हातभट्टी दारू विक्री जोमाने सुरू असल्याची माहिती नागरिकांकडूनमिळाली असल्याने या ठिकाणी स्वतः जाऊन दारू प्रतिबंधक कारवाई अंतर्गत कारवाई केली आहे. अशा दारू विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करणार असल्याचे संदीप पोमन यांनी सांगितले.

Exit mobile version