दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई

दोन लाखांचा दंड वसूल

| रायगड | प्रतिनिधी |

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यानुसार सुमारे 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षी 40 जणांवर कारवाई करीत सुमारे 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे. रायगडात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी मद्यप्राशनकरुन मोटार चालविणाऱ्या वाहकांना चाप बसण्यासाठी आता नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावीत ब्रेथ ॲनिलायझर लावण्यात आले होते. किती दारूचे सेवन केले आहे. याचा शोध घेत सुमारे 90 मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

मागील तिन महीन्यात सुमारे 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनेक वाहनचालक हे बेशिस्तपणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवत असतात. तर काही वाहनचालक हे दारु पिऊन वाहन चालवत असतात. अशा वाहनचालकांमुळे अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे वाहनचालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे अवाहन पोलिसांनी नारीकांना केले होते, त्याला उत्फुर्त प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला होता. मात्र, काही ठिकाणी नागरीकांनी मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडले तेथे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली.

Exit mobile version