जुगार, सट्टा चालविणार्‍यांविरुद्ध कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

बेकायदेशीररित्या आकड्यांचा जुगाराचा सट्टा चालविणार्‍याविरोधात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने छापा टाकून धडक कारवाई केली असून जवळपास 40 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील मानसी स्किल गेम या नावाने असलेल्या शॉपमध्ये आरोपी इर्शाद सरखोत व संगणक चालक सुरज राजभर यांनी विनगेम नावाचा ऑनलाईन स्किल गेम चालवून बेकायदेशीररित्या आकड्यांचा जुगार सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांना मिळताच वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास जुगाराचासाठी लागणारा 40 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version