आरडीसीसीचे संचालक म्हणून केलेल्या कार्याची दखल
| पनवेल | प्रतिनिधी |
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संतोष हरिभाऊ पाटील यांचा त्यांच्या सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘पनवेल टाइम्स’कडून सन्मान करण्यात आला. हरिग्राम येथील संतोष पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून काम करताना ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी जोडलेले काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. आमदार जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक तसेच माजी आ. विवेक पाटील आणि मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.







