| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथील रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चौघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलच्या माणघर येथील सारा रिसॉर्टमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवले जात होते. याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने रात्री त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी 15 ग्राहक हुक्का पिताना आढळले. त्यानुसार कारवाईत हुक्क्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर अवैधरित्या हुक्का पार्लर चालवल्याप्रकरणी चौघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







