| पनवेल | वार्ताहर |
मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या रिक्षाचालक आणि प्रवाशांचा वाद नवीन नाही. अनेकवेळा हा वाद वाहतूक शाखेत जात असतो. खारघर शहरात वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस.काणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेत सहा रिक्षाचालकांवर मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्याबाबत कारवाई करण्यात आली.
या सहा रिक्षाचालकांच्या कारवाईचा अहवाल पुढील कारवाईसाठी आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काणे यांनी दिली. या कारवाईदरम्यान सहायक पोलिस निरीक्षक आर. मोमीन आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या व भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर विरोधात तक्रार करण्याचे अवाहन यापूर्वीच आरटीओने केले आहे. याकरिता हेल्पलाईनदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार तक्रारीचे आवाहन करण्यात आले आहे.