| अलिबाग | वार्ताहर |
तालुक्यातील बोरपाडा येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ भाऊ भगत यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार, दि. 4 ऑगस्ट रोजी निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. काशिनाथ भगत यांच्या निधनाची बातमी समजताच शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, कावीर सरपंच राजू म्हात्रे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पार्थिवावर बोरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. काशिनाथ भगत यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. 13 ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.