विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध कारवाईचा बडगा

मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन पालिका आणि पोलिसांनी मुखपट्टीविना फिरणार्‍या बेजबाबदार मुंबईकरांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. रेल्वे प्रशासन मात्र कारवाईबाबत उदासीन असल्याचे आढळले आहे. पालिका आणि पोलिसांनी सात हजारांहून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली, तर तिन्ही रेल्वे मार्गावर एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांची संख्याही वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रात्रीच्या वेळी संचारबंदी जारी करण्यात आली आहे. तसेच मुखपट्टीचा वापर, हातांची स्वच्छता आणि अंतर नियमाचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही महिन्यांपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने मुखपट्टीचा वापर करण्याचा काही मुंबईकरांना विसर पडला आहे. आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुखपट्टीविना फिरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version