। मंडणगड । प्रतिनिधी ।
सरकारी खात्यात लाच घेण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. लाच घेताना मंडणगडमध्ये सर्कल, तलाठी व एका लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. महसूल विभागातील एका कामासाठी 45 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. ही लाच घेताना मंगळवारी (दि. 27) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसील कार्यालयाजवळ लाच लुचपत विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले. यामध्ये सर्कल अमित शिगवण, तलाठी श्रीरामे आणि कोषागार कार्यालयातील शिपाई भोसले यांचा समावेश आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. महसूल विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पकडल्यामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.